प्रा डॉ. सुरेश सुतार यांना राज्यस्तरीय शैक्षणिक व सामाजिक गौरव पुरस्कार

प्रा डॉ. सुरेश सुतार यांना राज्यस्तरीय शैक्षणिक व सामाजिक गौरव पुरस्कार
ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षीचा हा पुरस्कार आपल्या महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक डॉ. सुरेश सुतार यांना जाहीर झाला आहे.
सामाजिक विषयावरती दैनिका मध्ये लेख, दिवाळी अंकासाठी कथा लेखन, गरीब गरजू व होतकरू मुलांना आर्थिक मदत, उच्च शिक्षणावरती परिसरातील महाविद्यालयामध्ये व्याख्याने, कोरोना वरती माहितीपटाची निर्मिती, भारतीय कला व संस्कृती यावरती देशपातळीवर प्रश्नमंजुषा, स्वातंत्र्य दिनी देशभक्ती वरती देशपातळीवर प्रश्नमंजुषा, महाविद्यालयात आऊटरिच सेंटर सुरु करून समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवरती प्राध्यापकाना महाविद्यालयाबाहेर व्याख्याने देण्यासाठी व्यासपीठ तयार करून देणे, फोरम फॉर व्हॅल्यू एजुकेशन ची निर्मिती करून लेखक कवी व समाजसुधारक यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या विविध उपक्रमाने साजऱ्या करणे, मंदिर जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत आदी शैक्षणिक व व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सुतार सरांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
राज्यभरातून संस्थेकडे आलेल्या अनेक प्रस्तावातून सरांच्या प्रस्तावाची निवड झाली.ग्रामीण भागातील नातू महाविद्यालय सारख्या महाविद्यालयाला NAAC ची चांगली ग्रेड मिळऊन देण्यात NAAC कोओर्डिनेटर म्हणून त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
ते कार्यरत असलेले नातू महाविद्यालय येणाऱ्या काळात NAAC ला सामोरे जाणार आहे. अश्या पुरस्कारामुळे महाविद्यालयाला NAAC कडून चांगली ग्रेड मिळण्यास मदतच होणार आहे!
प्रा.डॉ.सुरेश सुतार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!