मार्गताम्हाने कॉलेजच्या फोरम फॉर अचिव्हर्स अचिव्हमेंट तर्फे संशोधकांचा सत्कार

मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कॉलेज ऑफ आर्टस् अँड सिनियर कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये संशोधनाच्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या संशोधकांचा गुणगौरव करण्याच्या हेतूने फोरम फॉर अचिव्हर्स अचिव्हमेंट या नवीन विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाअंतर्गत इतर महाविद्यालयातील एम फिल व पी. एच डी पदवी संपादन केलेल्या बावीस संशोधक प्राध्यापकांचा सत्कार ई प्रमाणपत्र देऊन करण्यात आला आहे. त्याचवेळी महाविद्यालयातील पी एच डी पदवी प्राप्त केलेल्या संशोधक प्राध्यापकांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आय सी एस कॉलेजचे प्राचार्य डॉ गोपीनाथ सारंग यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी महाविद्यालय राबवत असलेल्या या नवीन उपक्रमाचे विशेष कौतुक डॉ सारंग यांनी केले. यावेळी प्रा डॉ संगीता काटकर यांच्या संशोधन पर पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. फोरम चे समन्वयक प्रा डॉ सुरेश सुतार यांनी हा उपक्रम राबवण्यामागील उद्देश आपल्या प्रास्ताविकामध्ये व्यक्त केला. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयकुमार खोत यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विकास मेहेंदळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा डॉ सत्येंद्र राजे यांनी केले