चिपळूण नगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र व एन 95 मास्क चे वाटप

मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कॉलेज ऑफ आर्टस् अँड सिनियर कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये समाजउपयोगी कार्यक्रमांसाठी आऊटरिच सेंटर फॉर एक्स्टेंशन ऍक्टिव्हिटीज या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाच्या वतीने चिपळूण नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क व हॅन्डग्लोव्ज चे मोफत वितरण करण्यात आले. त्याचबरोबर आऊटरिच सेंटर तर्फे कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा देऊन समाजसेवा करणाऱ्या आरोग्य विभाग अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षा मा. सौ सुरेखा खेराडे व आरोग्य समिती सभापती मा. श्री शशिकांत मोदी यांच्या हस्ते कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आऊटरिच सेंटर चे समन्वयक प्रा डॉ सुरेश सुतार यांनी या प्रसंगी सेंटर तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. यावेळी
नगराध्यक्षा मा. सौ सुरेखा खेराडे व आरोग्य संमिती सभापती यांच्या हस्ते श्री. वैभव निवाते, आरोग्य विभाग प्रमुख, श्री. अनंत मोरे, कार्यालयीन अधीक्षक यांचा कोव्हीड योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या
प्रसंगी आऊटरिच सेंटरचे समन्वयक प्रा. डॉ सुरेश सुतार, प्रा विकास मेहेंदळे, डॉ नामदेव डोंगरे, प्रा रामचंद्र माने, श्री अनिल कांबळे आदी उपस्थित होते. चिपळूण नगरपालिके तर्फे महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.