मार्गताम्हाने महाविद्यालयात ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न

मार्गताम्हाने महाविद्यालयात ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न
मार्गताम्हाने : येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग, निबंध वक्तृत्व मंच व IQAC च्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभाई पटेल यांच्या जन्मदिनी ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी भारतीय ‘स्वातंत्र्य लढ्यातील सरदार वल्लभाई पटेल यांचे योगदान ‘, ‘शेतकरी नेते सरदार वल्लभाई पटेल,’ ‘ संस्थानांच्या विलीनीकरणात सरदार वल्लभाई पटेल यांची भूमिका,’ ‘ ऑपरेशन पोलो आणि सरदार वल्लभाई पटेल ‘ आदी विषयावरती आपले निबंध ऑनलाईन पद्धतीने सादर केले. या स्पर्धेत मंजिरी प्रशांत जंगम, डॉ. नातू महाविद्यालय मार्गताम्हाने हिने प्रथम, अविनाश अनंत रहाटे, तानाजी चोरगे कॉलेज पालवण याने द्वितीय तर निलेश शांताराम शिगवण तानाजी चोरगे कॉलेज पालवण याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण डॉ एन बी डोंगरे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे